Worli Shinde Group And BJP : वरळीत शिंदे गट आणि भाजपचं शक्तिप्रदर्शन : ABP Majha
Continues below advertisement
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे... आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं... ते आव्हान मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार का हे पाहावं लागणार आहे... आज सायंकाळी 6 वाजता वरळीच्या आदर्श नगरमधील
वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे..... या कार्यक्रमात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय... या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आता या दोन्ही नेत्यांचे वाग्बाण कुणाला घायाळ करतात ते पाहावं लागणार आहे...
Continues below advertisement