Winter Assembly Session : अखेर नवाब मलिकांचं ठरलं, Nawab Malik सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटी

Continues below advertisement

Winter Assembly Session : अखेर नवाब मलिकांचं ठरलं, मलिक सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटी
राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांचं ठरलं, सभागृहात मलिक सत्ताधारी बाकावर शेवटच्या रांगेत बसले, मलिक अजित पवार गटासोबत असल्याच्य़ा चर्चा

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session) नागपुरात हजेरी लावली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्यातच आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत कालपासून चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram