Raj Thackeray : जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा मी आपल्यासमोर येईन, राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा

Raj Thackeray :  मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंबर कसताना दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा आणि भाजपच्या जागर सभांच्या धर्तीवर मनसेकडून घे भरारी अभियानाची आखणी करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक महापालिका मतदारसंघात होणार मनसेच्या वतीनं सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. घे भरारी अभियानाच्या निमित्तानं प्रत्येक महापालिका वॉर्डातील मैदान आणि चौकात मनसे नेते आणि सरचिटणीस सभा घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जानेवारी आणि फेब्रुवारीत सभा घेणार आहेत. मनसेच्या घे भरारी अभियानाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असं सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola