Goa Election : गोव्यात विश्वजीत राणेंना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता
Goa Election : गोव्यात निकालानंतर दहा दिवस उलटले तरी अद्याप सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. तसेच अद्याप विधीमंडळातील नेत्याची निवड देखील केलेली नाही. अशातच भाजपचे वाळपई मतदारसंघातील आमदार विश्वजीत राणे नाराज असून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा देखील गोव्यात रंगली होती. दरम्यान, असं असलं तरी विधीमंडळाचा नेता आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी प्रमोद सांवत यांच्या खांद्यावर राहणार असून विश्वजीत राणे यांना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. मुख्य बाब म्हणजे राणे मागील तीन दिवसांपासून दिल्लीतच तळ ठोकून आहेत.