Vishal Patil Sangli Loksabha : सांगलीमधून विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल : ABP Majha
Continues below advertisement
सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केलाय.. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान विशाल पाटलांचं सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन सुरू आहे... विशाल पाटील यांची रॅली काँग्रेस भवन येथे पोहचलीये...
Continues below advertisement