Vilas Lande : बारामती पाठेपाठ शिरुर मतदारसंघातही अजितदादांची कोंडी? विसाल लांडेंची मागणी काय?
Continues below advertisement
अजित पवारांनी शिंदे गटातील शिवाजी आढळरावांना आयात करू नये. त्याऐवजी एकतर मला संधी द्यावी. अथवा थेट भाजपला जागा सोडून, महेश लांडगेना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावं. असं म्हणत भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची कोंडी केलीये. बारामती पाठोपाठ आता शिरूर लोकसभेत ही अजित पवार कचाट्यात अडकणार हे स्पष्ट झालंय. अमोल कोल्हेना पुन्हा खासदार होऊ देणार नाही. असा चंग बांधलेल्या अजित पवारांसमोर आधी स्वपक्षीयांची नाराजी दूर करण्याचं आव्हान उभं ठाकलयं. विलास लांडे नेमके इतके आक्रमक का झालेत? शिवाजी आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला ते का विरोध करतायेत? सलग दोन विधानसभेत त्यांचा पराभव करणाऱ्या महेश लांडगेचा प्रचार करायची तयारी त्यांनी का दर्शवली आहे? हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.
Continues below advertisement