Vasant More : राजीनामा देताच अनेक पक्षांकडून फोन : वसंत मोरे : ABP Majha
Continues below advertisement
मनसेचे माजी फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी काल आपल्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला. त्यानंतर मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चांना उधाण आलं. कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, अजित पवार गट, ठाकरे गट या पक्षांकडून फोन आल्याचं वसंत मोरेंनी 'माझा'शी बोलताना सांगितलं. तसंच राज ठाकरेंचा देखील फोन आपल्याला फोन आला होता,मात्र मी तो उचलला नसल्याचंही मोरे म्हणालेत. तर येत्या दोन ते तीन दिवसांत आपण निर्णय घेणार असल्याचंही यावेळी मोरेंनी सांगितलं.
Continues below advertisement