Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रिया

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरून पुन्हा एकदा गोंधळ झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरेंचं आगमन झालं होतं. त्यावेळी वरूण सरदेसाईंशी चर्चा करताना 'हरामखोर आहेत ते' असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे कुणाला हरामखोर म्हणाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

यंदाच्या अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावर गोंधळ झाल्याचं दिसून आलं. या आधी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले. त्यानंतर आज भाजपचे आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना अनेक आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली. सुशांतसिंह राजपूत मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घराची रातोरात रंगरंगोटी कुणी केली असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच या प्रकरणी बिहारचे पोलिस तपासासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना सहकार्य न करता माघारी का पाठवलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

उद्धव ठाकरे संतापले

दिशा सालियन प्रकरणावरून गोंधळ होत असताना उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या परिसरात आले. त्यावेळी सभागृहात जात असताना त्यांनी आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी चर्चा केली. हे प्रकरण कुणी उकरून काढलं असा प्रश्न त्यांनी वरुण सरदेसाई यांना विचारला. त्यावर वरुण सरदेसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'हरामखोर आहेत ते' असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य हे माध्यमांच्या कॅमेरामध्ये कैद झालं. 

भाजप नेते राम कदमांना उद्देशून वक्तव्य? 

दिशा सालियन आणि सुशांत सिहं राजपूत प्रकरणी राम कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना उद्देशून हरामखोर हा शब्द वापरला की काय अशी चर्चा सुरू झाली. पण उद्धव ठाकरे यांनी हरामखोर असं नेमकं कुणाला म्हटलं हे मात्र स्पष्ट होत नाही. ते भाजपच्या कोणत्या नेत्याला उद्देशून होतं हे स्पष्ट होत नाही. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola