ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 25 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 25 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार, शिवभक्तांचा संताप लक्षात घेत, पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात घेऊन जावं लागणार.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी केलंय अटक, तब्बल १ महिन्यानंतर अटक
विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला. इंद्रजीत सावंतांची प्रतिक्रिया. 'कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत' सावंतांचं वक्तव्य.
कोरटरला नागपूरच्या कोणत्या नेत्याचं संरक्षण होतं का? याची चौकशी व्हायला पाहिजे, अनिल देशमुखांची मागणी.
कामरा प्रकरणी जी तोडफोड झाली तो विषय शांत करण्यासाठी कोरटकरला अटक, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, आता त्याला व्हिआयपी ट्रिटमेंट देतात की बेड्या ठोकून आणतात हे पाहणं महत्वाचं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.
प्रशांत कोरटकरच्या अटकेला एक महिना का लागला, अमोल मिटकरींचा सवाल, कोरटकरच्या अटकेला उशिर हे नागपूर पोलिसांचं अपयश.
कुणाल कामरावर गुन्हा झाल्यानंतर खार पोलिसांनी कामराला बजावली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, कामराचा फोन देखील बंद असल्याने त्याला ट्रेस करण्यात पोलिसांना अडचणी.
कुणाल कामराशी मुंबई पोलिसांचा अखेर संपर्क,एबीपी माझाला सूत्रांची माहिती,व्हिडीओतील वक्तव्याबद्दल खेद नसल्याचं कामराचं स्पष्टीकरण.
आपण माफी मागणार नसल्याचं कुणाला कामराचं स्पष्टीकरण.. आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलो नसल्याचं कामराचं वादानंतर अधिकृत स्टेटमेंट.
कुणीही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करु शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य.
संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय परंतु त्याने ते योग्य पद्धतीने मांडावे, अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधाताली गाण्यावर प्रतिक्रिया