Uddhav Thackeray Saamana on Devendra Fadnavis : वाद मिटणार? ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस यांना साद
राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली कटुता संपवा अशी साद ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालण्यात आलीय. राज्याच्या राजकारणात कटुता निर्माण झाल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातून फडणवीस यांना कटुता संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.