Uddhav Thackeray CM Meeting | उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला,विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा
विधीमंडळ परिसरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा करण्यासाठी ते आपल्या आमदारांसह फडणवीसांच्या दालनात पोहोचले. या भेटीपूर्वी त्यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली होती. दोन अधिवेशनं विरोधी पक्षनेतेपदाविना पूर्ण झाली आहेत, अशी चर्चा एकीकडे सुरू असताना ही भेट महत्त्वाची ठरली आहे. विधान भवन आणि विधानसभेतही या भेटीबाबत चर्चा सुरू होती. काल अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळीही उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदावर भाष्य केले होते. या भेटीत नेमके काय मुद्दे चर्चिले जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या अनुषंगाने अनेक मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे.