Marathwada Rain Deficit | मराठवाड्यात पावसाची ओढ, चिंता वाढली; Latur मध्ये 28 दिवस कोरडे!
मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा ते अठ्ठावीस दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस बरसलेला नाही. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात अठ्ठावीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. बीड वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस झालेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस गायब आहे. तसेच जालन्यातही पंधरा दिवस झाले तरी पावसाचा पत्ता नाही. परभणी जिल्ह्यातही पंधरा दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. हिंगोलीत देखील पंधरा दिवसांपासून पावसाची दडी कायम आहे. धाराशिव जिल्ह्यातही अठरा दिवसांपासून पावसाचा थेंबही पडलेला नाही, अशी माहिती धाराशिवकरांनी दिली आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.