Maha Vikas Aghadi | 'ठाकरे सरकार'वर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169-0 मतांनी जिंकला | ABP Majha
Continues below advertisement
महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केलं तर विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केलं. तर चार सदस्य तटस्थ राहिले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुपारी 2 वाजता विधानसभेचं कामकाज सुरु झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.
Continues below advertisement