Rahul Gandhi आणि Uddhav Thackeray पहिल्यांदाच भेटणार , या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता

महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर डॅमेज कंट्रोल सुरू आहे असं दिसतंय. कारण राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याचं कळतंय. दौऱ्याची नेमकी तारीख निश्चित झाली नसली तरी येत्या काही दिवसांत ही भेट होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधींनी टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पवारांनी डॅमेज कंट्रोल केलं होेतं... त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची समजली जातेय... दरम्यान राहुल गांधी उद्धव ठाकरेंसह देशातील महत्त्वाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची देखील राहुल गांधी भेट घेणार आहेत... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola