Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : अवलादी, अब्दाली ते भाजप, उद्धव ठाकरे बरसले

Continues below advertisement

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : अवलादी, अब्दाली ते भाजप, उद्धव ठाकरे बरसले...

मुंबई :  तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगती मशाल निखारा माझ्याकडे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. रावण हा शिवभक्त होता... तरीही त्याला रामाला मारावं लागले....वध करावे लागले....कारण तो माजला होता... ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली....तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारी धगधगती मशाल माझ्याकडे आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले. जरांगे यांनी धनगरांच्या आरक्षणाच्या मुद्याला पाठिंबा दिला. जातीमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जरांगे यांचे अभिनंदन करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.  मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात विशेष कायदा का केला नाही असा सवालही त्यांनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram