Uddhav Thackeray : समाजवादी पक्षासोबत ठाकरे गटानची युती, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना ठाकरे गट (Thackeray Group) आणि समाजवादी (Samajwadi Party) पक्षाची संयुक्त बैठक रविवार (15 ऑक्टोबर) रोजी पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. यावेळी त्यांनी या युतीविषयी भाष्य केलंय. तसेच त्यांना यावेळी महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'महात्मा फुलेंची पगडी घालण्यासाठी तितकं मोठं डोकं लागतं, मी तितका मोठा नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की, ती माझ्या हातात द्या. मी मुख्यमंत्री असताना लाडका होतो पण आता कोणीही मला लाडके माजी मुख्यमंत्री असं म्हणत नाही, अशी मिश्किल टीप्पणी देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.'