3 Language Policy Cancels त्रिभाषा सूत्र रद्द;5 जुलैला ठाकरे शिवसेना-मनसे एकत्र विजयी मोर्चा काढणार?
राज्य सरकारने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला आहे. उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैला 'विजयी मोर्चा' किंवा सभा घेण्याचा विचार व्यक्त केला. 'मराठी माणसांना एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये,' असे म्हणत त्यांनी मनसेशी युतीचे संकेत दिले. राज ठाकरेंनी या संदर्भात नेत्यांची बैठक बोलावली आहे. 'मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे,' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.