TOP 100 Headlines 10 AM : सकाळी 6 च्या टॉप 100 हेडलाईन्स 30 June 2025 ABP Majha
आजपासून १८ जुलैपर्यंत विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तीन आठवड्यांच्या या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना मदत हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांची पक्षातल्या सर्व आमदार, मंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे यांना पक्षातील सर्व निर्णयांवर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा प्रस्ताव अजूनही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन असल्याने हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता आहे.