Shirdi : शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून सुरू झालेला साई परिक्रमा उत्सवाचं यंदाचं चौथं वर्ष
Continues below advertisement
शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून सुरू झालेला साई परिक्रमा उत्सवाचं यंदाचं चौथं वर्ष असून पहाटे शिर्डीतील खंडोबा मंदिरापासून या परिक्रमेला भक्तिमय वातावरणात सुरुवात झालीय.... साई रथाचं पुजन पार पडल्यानंतर साई परिक्रमेस सुरूवात झाली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर , खासदार सदाशिव लोखंडे, सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज तसंच शिर्डी ग्रामस्थांसह देशभरातुन आलेले हजारो साईभक्त मोठ्या संख्येने या परिक्रमेत सहभागी झालेत.. साई नामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमून गेलीय.. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी साईबाबांच्या जीवनावर साकारलेले चित्ररथ अनेकांचं लक्ष वेधून घेतायत...
Continues below advertisement