Ajit Pawar : काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना सुरु केली आहे, अजित पवारांचं वक्तव्य

जुनी पेन्शन, एकच मिशन म्हणत सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसह राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी झालेत... त्यामुळे राज्यात सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे...  सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकारी कामांना मोठी झळ बसतेय... तर सरकारी रुग्णालयांतील काम थंडावलंय... संपात नर्स, वॉर्डबॉय आणि कर्मचारी सहभागी झाल्याने केस पेपर काढणे, रुग्णांची प्राथमिक तपासणी खोळंबलीय... परिणामी रुग्णसेवेच्या कामाल मोठा ब्रेक लागलाय... हे कमी म्हणून की काय संपामुळेे दहावी तसेच बारावीच्या परीक्षांचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता आहे... संप काळात बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नसल्याची भूमिका राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांनी घेतलीय... असं असलं तरी संपकाळात परीक्षा होणार, हेही त्यांनी स्पष्ट केलंय.. पण पेपर तपासणार नसल्यानं निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे... थोडक्यात या संपाची मोठी झळ बसणार आहे...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola