BJP Committee | भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर महाराष्ट्रातल्या 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

Continues below advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरआहेत. काल अमित शाह, पंतप्रधान मोदी यांच्या भेटी घेतल्यानंतर आज ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनाही भेटले. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकी काय राजकीय खलबंत शिजत असल्याची चर्चा सुरु आहे. लवकरच भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी गठीत होणार आहे. त्याचीही चर्चा यानिमित्तानं सुरु आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा यांनी जानेवारी 2020 मध्ये सूत्रं स्वीकारली. नव्या अध्यक्षासोबत नवी टीमही बनते. त्यामुळे पुढच्या आठवडाभरात भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होऊ शकते अशी चर्चा आहे. साधारण 120 सदस्य देशभरातून या कार्यकारिणीत असतात. त्यातल्या काही सदस्य तर काहींना संघटनात्मक महत्वाची जबाबदारी दिली जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram