Thane Thackeray Group : ठाण्यात ठाकरे गटाचा एल्गार, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा : ABP Majha
ठाण्यात आज ठाकरे गट मोठा मोर्चा काढणार आहे.. रोशनी शिंदे प्रकरणात पोलिसांनी पक्षपातीपणा केला असा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून शिवाजी मैदान ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण करण्यात आली. उद्धव आणि रश्मी ठाकरेेंनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.