Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर येत्या दिवाळीत खुलं होणार : ABP Majha
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पणही आता पूर्वनियोजित वेळेआधी म्हणजे यावर्षी दिवाळीच्या सुमारास नाेव्हेंबरमध्ये होणार आहे. नवीन संसद भवनाचा शुभारंभही याच वर्षी जुलैमध्ये होणार असून, पुढील पावसाळी अधिवेशन नव्या इमारतीत होणार आहे. नरेंद्र माेदींना सर्व प्रकल्प लवकर पूर्ण करायचे आहेत. त्याच मुद्द्यांवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका भाजप लढवू इच्छित आहेत. याचमुळे अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राममंदिराची लोकार्पणाची तारीखही अलीकडे आणण्यात आली आहे. आता नवीन तारीख दिवाळीच्या आसपास निश्चित केली जात आहे.