Uddhav Thackeray यांनाही Whip मानावा लागणार? प्रतोदचं महत्व काय? : ABP Majha
निवडणूक आयोगानं नाव आणि पक्षचिन्ह शिंदेंना दिल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे... कालच शिवसेनेतर्फे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देत शिवसेनेचा प्रतोद नेमण्याची मागणी करण्यात आलेय... प्रतोदपदी विप्लव बजोरिया यांच्या नावाचा ठराव शिवसेना विधिमंडळ पक्षात झाल्याचं या पत्रातून सूचित करण्यात आलंय.... उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.. त्यामुळे आता ठाकरेंनाही शिंदेंच्या शिवसेनेचा व्हिप मानावा लागणार का असा प्रश्न विचारला जातोय.. त्यामुळे ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला वार करण्यात आल्याचं बोललं जातंय. तर तिकडे ठाकरे गटाकडून आमदार विलास पोतनीस यांचं नाव देण्यात आलंय.... विरोधी पक्षांच्या बैठकीत पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय... त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टात