Thackeray VS Eknath Shinde :खरी शिवसेना कुणाची ? ठाकरे वि शिंदे आज केंद्रीय निवडणूक आयोगात:ABP Majha
खरी शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे.. शिवसेना पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याचं समजतंय... सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना आयोगाने निर्णयाची घाई करु नये अशी विनंती शिवसेना करणार आहे.. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे.. जे लोक आयोगासमोर आलेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तीवाद आहे.