Sanjay Raut On EVM : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशाचं गुपित ईव्हीएममध्ये दडलंय, असा दावाही त्यांनी केला. सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये, जनतेच्या मनातही त्याबद्दल शंका-कुशंका आहेत असंही ते पुढे म्हणाले