Thackeray गटाला 'मशाल', शिंदे गटाला कोणतं?, Shinde गट ' बाळासाहेबांची शिवसेना' : ABP Majha
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हासमोर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे. शिंदे गटाने सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय आयोगाकडे दिले आहेत. त्यात त्यांना तळपता सूर्य चिन्हं मिळेल अशी शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे.