Tata Airbus Project Vedanta Foxconn ते Bulk Drugs Park, महाराष्ट्राने गमावले मोठे प्रकल्प
Continues below advertisement
Tata Airbus C295 : मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून चार मोठे प्रजेक्ट इतर राज्यात गेले आहेत. या प्रोजेक्टची किंमत 1.80 लाख कोटी रुपये इतकी आहे. प्रोजेक्ट गेल्यामुळे महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. या प्रोजेक्ट्समुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळफास एक लाख जणांना रोजगार मिळणार होता. पण हे प्रोजेक्ट्स गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराची संधीही हुकली आहे. महाराष्ट्रातून कोट्यवधी रुपयांचे प्रोजेक्ट्स गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेय. अवघ्या तीन महिन्यात महाराष्ट्रातून गेलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल जाणून घेऊयात...
Continues below advertisement