Ashish Deshmukh In BJp : काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब

काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देणार, अशी चर्चा नागपुरात सुरू आहे. मात्र माझाला मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नाही. त्यांना आधी संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल, असं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola