Sushma Andhare Thackeray Group : ठाकरे गटाचा Dasara Melava सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Sushma Andhare : ठाकरे गटाचा दसरा मेळावा सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया.. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर आणि शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) यंदा पहिलाच मेळावा होत आहे. येत्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होत असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्य भाषण असलेल्या या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाकडून कोणते शिलेदार भाषण करणार, याची उत्सुकता लागली आहे. ठाकरे गटांच्या वक्त्यांच्या नावाची यादी समोर आली आहे. ही यादी जवळपास निश्चित असल्याचे समजले जात आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे भाषण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement