Suraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय ? ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSuraj Chavan ED Arrest : सूरज चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय ?मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती.सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे.