Supriya Sule On Sharad Pawar : शरद पवारांना संपवण्याचा षडयंत्र : सुप्रिया सुळे : ABP Majha
मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पहायला मिळालं. दरम्यान सुनेत्रा पवार का रडल्या असतील याचे उत्तर हे त्यांनाच विचारावं लागेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय. शरद पवार दोन शब्दांत बोलले ते जास्त बोललेले नाहीत त्यामुळे नक्की अजित पवार काय बोलले हे पाहावं लागेल असंही सुळे म्हणाल्यात.