Supreme Court on Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आज सुनावणी नाही

Continues below advertisement

Supreme Court on Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आज सुनावणी नाही

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य पुन्हा अधांतरी राहिलं आहे. या प्रकरणातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी आजही होऊ शकली नाही. गेल्या तीन-चार महिन्यांपासून हे प्रकरण सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता पुढची नवी तारीख कुठली मिळते हे पहावं लागेल. 92 नगरपरिषद मध्ये ओबीसी आरक्षण लागू व्हावं यासाठी आणि 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रभाग रचनेबाबत शिंदे फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे हे प्रकरण कोर्टात पोहोचला आहे आणि त्यामुळे निवडणुकांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला होता त्यानंतर आजतागायत या सगळ्या प्रकरणात कुठलीही सुनावणी होऊ शकलेली नाही. मुंबई पुण्यासह 23 महानगरपालिका 25 जिल्हा परिषदा २०७ नगरपंचायती या सगळ्या निवडणुकांचे भवितव्य या एका सुनावणीवर अवलंबून असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram