Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी : ABP Majha
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर अरविंद केजरीवाल यांची अटक वैध असल्याचा निर्णय देत दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर आज सुनावणी होईल.