sudhir Mungantiwar | जनादेश महायुतीला, त्यामुळे सरकार महायुतीचंच : सुधीर मुनगंटीवार | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून उद्या (7 नोव्हेंबर) चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. अवकाळी पावसाच्या नुकसानाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली. या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपनं चर्चेसाठी दिलेल्या आमंत्रणावर शिवसेनेनं अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तरी नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram