Ashok Chavan | बिगर भाजप सरकार बनणं ही काँग्रेसजनांची इच्छा : अशोक चव्हाण | ABP Majha
राज्यात बिगर भाजप सरकार येणं ही काँग्रेसजनांची इच्छा असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. तसेच यासंदर्भात शिवसेनेने भूमिका घ्यावी असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे.
जनतेने कौल काही भाजपच्या बाजूने दिलेला नाही, त्यामुळे भाजपचं सरकार राज्यात येता कामा नये हा प्रमुख निष्कर्ष आहे. यासाठीचे सर्व पर्याय आम्ही चर्चा करुनचं निर्णय घेऊ असंही चव्हाण म्हणाले. पण प्रथम निर्णय शिवसेना काय घेते हा महत्त्वाचा विषय आहे. शेवटी शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतरचं राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल. त्यामुळे बिगर भाजप सरकार येणं हे आमचं प्राधान्य राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले.