Bhima Koregaon एल्गार परिषदेप्रकरणी Sudha Bharadwaj यांना जामीन मंजूर, कोण आहेत सुधा भारद्वाज ?
Continues below advertisement
शहरी नक्षलवाद प्रकरणी जामीन मागत हायकोर्टात आलेल्या सुधा भारद्वाज यांना दिलासा देत हायकोर्टानं त्यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. 4 ऑगस्ट रोजी या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करत हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. जो न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं बुधवारी जाहीर केला. मात्र याप्रकरणातील नऊ पैकी केवळ एकट्या सुधा भारद्वाज यांचा जामीन मंजूर करण्यात आला असून, या जामीनाच्या अटीशर्ती सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टाला ठरवण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement