Devendra Fadnavis Solapur : सोलापुरच्या कार्यकर्त्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.. या दौऱ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सोलापुरात पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यासाठी सोलापुरातील एका कार्यकर्त्याने खास चादर तयार केलीय. सोलापूरची चादर ही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. याचं सोलापुरी चादरवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा रेखाटून नेतृत्व महाराष्ट्राचे, भविष्य भारताचे असा उल्लेख करण्यात आलाय.