Sonia Gandhi ED Investigation : सोनिया गांधींची ईडी चौकशी, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीवरून काँग्रेस आक्रमक झालंय. देशभरात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या खासदारांसह विजय चौकाजवळ चौकशीविरोधात धरणे दिले. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, शक्तीसिंह गोहिल यांच्यासह अनेक खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चा काढत होते. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, सरकार ना चर्चा करत आहे, ना बोलू देत आहे. काँग्रेस नेत्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याबद्दल सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram