Eknath Shinde Birthday Wish Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes To Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे.  एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola