
Sonia Gandhi ED Enquiry : सोनिया गांधी यांची आजची ईडी चौकशी संपली, तब्बल तीन तास झाली चौकशी
Continues below advertisement
Sonia Gandhi Questioned : नॅशनल हेराल्डप्रकरणी सुरू असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चौकशी संपली. सोनिया गांधी यांची चौकशी तब्बल तीन तास सुरू होती. सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित होत्या. तुम्हाला जे विचारायचे आहे ते तुम्ही विचारू शकता मी 8 वाजेपर्यंत बसण्यास तयार आहे. तसेच मी उद्या देखील येण्यास तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या परंतु इडीकडे कोणतेही प्रश्न नव्हते.
Continues below advertisement