Uttar Pradesh Rain : उत्तरप्रदेशमध्ये मोठा पाऊस, सोमभद्रमध्ये मोठं नुकसान ABP MAJHA
उत्तर प्रदेशमध्ये तुफान पाऊस सुरू असून सोनभद्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शक्तिनगर ओबरा यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले असून काही भागातील मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत.