Sanjay Raut: '...तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे'- संजय राऊत

Continues below advertisement

राज्यसभेतील १२ खासदारांच्या निलंबनावरुन केंद्र सरकारला घेरण्यासाठी मंगळवारी म्हणजेच परवा विरोधी पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. यावेळी राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोवरुन सोशल मीडियावर राऊतांना ट्रोलही करण्यात आलं. त्याला उत्तर देताना राऊतांना संताप अनावर झाला. यावेळी अडवाणी जरी असते तरी खूर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य, वडीलधारी माणसाला खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृती आहे, अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी ट्रोल आणि टीका करणाऱ्यांसाठी अपशब्द देशील वापरले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram