Sulochana Chavan Death :वयाच्या नवव्या वर्षी गाण्याला सुरुवात करणाऱ्या गायिका सुलोचना चव्हाण कालवश
Sulochana Chavan : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.