Shivshakti and Bhimshakti :  राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचं स्पष्ट

Continues below advertisement

 राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशी मागणीदेखील वंचितकडून करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram