Shivajirao Adhalrao patil meet Amol Kolhe : आढळराव आणि कोल्हेंनी एकमेकांचे धरले पाय
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात सभा पार पडतेय. तत्पूर्वी शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांची पुन्हा एकदा भेट झाली. यावेळी आधी कोल्हेनी आढळरावांचे मग आढळरावांनी ही कोल्हेचे पाय धरले. यावेळी अमोल कोल्हेंनी मोदींच्या एका वक्तव्याची आठवण करुन दिली. 2014मध्ये गॅसचे दर चारशे रुपये होतं, त्या गॅसला नमस्कार करून मतदानाला जा. असं मोदी म्हणाले होते. आता तर गॅसचे दर अकराशे रुपये झालेत. मग आता तीनवेळा नमस्कार घालून मतदानाला जा. असं म्हणत मोदींच्या पुण्यातील सभेदिवशी कोल्हेंनी आढळरावांसमोर आठवण करून दिली.
Continues below advertisement