Hingoli Lok Sabha : पराभव झाल्यास राजकारण सोडून वकिलीची प्रॅक्टिस करेन : शिवाजी जाधव : ABP Majha
हिंगोली लोकसभेची जागा शिवसेना सुटल्यानंतर भाजपमधील तीन नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली आहे त्यापैकी रामदास पाटील सुंठाणकर योगी श्याम भारती महाराज या दोन भाजपच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतले आहे परंतु माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजप नेते शिवाजीराव जाधव यांची उमेदवारी मात्र कायम आहे तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेतील अशी भाजपच्या नेत्यांचे अपेक्षा होती परंतु त्यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंतही शिवाजी जाधव यांनी उमेदवारी मागे घेतली नाही त्यामुळे याचा फटका स्वभाविकच महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे शिवाजी जाधव यांनी 2019 मध्ये वसमत विधानसभेत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती तेव्हा त्यांनी अपक्ष असताना सुद्धा तब्बल 67 हजार मतं घेतली होती त्यामुळे या लोकसभेमध्ये निश्चित महायुतीच्या उमेदवाराला जाधव यांच्या उमेदवारीचा फटका बसणार आहे