Vilas Muttemwar Angry : घोषणाबाजी बंद करा विकास ठाकरेंच्या पाठीशी कायम राहा, मुत्तेमवार संतापले
Vilas Muttemwar Angry : घोषणाबाजी बंद करा विकास ठाकरेंच्या पाठीशी कायम राहा, मुत्तेमवार संतापले जर असे वारंवार होणार असेल, तर उद्या आम्हीही गडकरी यांच्या सभा होऊ देणार नाही.. आमच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना ही आम्ही पाहून घेऊ.. मोदी विरोधातील वक्तव्यानंतर घराजवळ आंदोलन करून जाळपोळ करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना विलास मुत्तेमवार यांचा सज्जड दम... मी बोली भाषेत "इनके बाप का माल है क्या" अशा आशयाने बोललो, मी कोणाचेही नाव घेतले नाही असा स्पष्टीकरण ही मुत्तेमवार यांनी दिला आहे... निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ही भाजप कार्यकर्त्यांनी काल माझ्या घराजवळ आंदोलन केले, घोषणाबाजी करत जाळपोळ केली आणि हे सगळं होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊन सर्व पहात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी केला आहे... आम्ही संयम पाळला जर आमचेही 400 लोक आले असते तर काय झालं असतं असा सवाल ही मुत्तेमवार यांनी विचारला आहे... भाजपने माझ्यावर मोदींच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला... मात्र, मी बोली भाषेत "इनके बाप का माल है क्या" अशा आशयाने बोललो होतो, मी कोणाचेही नाव घेतले नव्हते असे स्पष्टीकरण ही मुत्तेमवार यांनी दिले आहे... दरम्यान मोदी नेहमी आमच्या नेत्यांची आणि इतर पक्षातील नेत्यांची खानदान काढतात त्याचं काय असा सवाल ही मुत्तेमवार यांनी विचारला आहे.. भाजप कार्यकर्त्यांमध्ये सहिष्णुताच राहिलेली नाही... जर असे वारंवार होणार असेल, तर उद्या आम्हीही गडकरी यांच्या सभा होऊ देणार नाही.. आमच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांनाही आम्ही पाहून घेऊ असा इशाराही मुत्तेमवार यांनी दिला आहे... भाजप ने असे कितीही आंदोलन केले तरी माझे बोलणं थांबवू शकणार नाही.. फक्त काँग्रेस नेता म्हणून नाही तर एक मतदार म्हणून ही मला बोलण्याचा अधिकार आहे, मी बोलतच राहणार असेही मुत्तेमवार म्हणाले..