Shiv Sena Thackeray Group | नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते Sudhakar Badgujar यांची मुख्यमंत्र्यांशी भेट
नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी महापालिकेतील रिक्त जागा भरण्याची मागणी केली. महापालिकेत 7000 कर्मचाऱ्यांपैकी 41 पदे रिक्त असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. काही क्लास वन कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असून क्लास थ्री कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची मागणी केली. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे चर्चा रंगली.
आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी -
आरोपांच्या माऱ्यानंतर विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय...आरोप करणाऱ्यांनी नव्यानं निघणाऱ्या निविदेत भाग घ्यावा, शिरसाटांचं अंबादास दानवेंना आव्हान...
निवडणुका असल्यानं घाईघाईत निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, अजित पवारांनी केली चूक मान्य...पण वर आता कारवाई करून काय फायदा?, अजितदादांचं वक्तव्य
नाशकात दोन राजकीय नेत्यांकडील लग्नाची चर्चा...
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्नसोहळ्याला शिंदेंची हजेरी...संजय राऊतांचीही उपस्थिती...तर फडणवीस पुतण्याच्या लग्नासाठी नाशकात...