Ranajagjitsinha Patil on AI : सोयाबीन पिकासाठी AI चा वापर, धाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट

Ranajagjitsinha Patil on AI : सोयाबीन पिकासाठी AI चा वापर, धाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट

सोयाबीन पिकासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार 

राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिवमध्ये पहिला पायलट प्रोजेक्ट 

पायलट प्रोजेक्टसाठी धाराशिवच्या उपळा गावाची निवड , वेगवेगळे उत्पादन गटातील शेतकऱ्यांचा सहभाग असणार

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून राहुरी कृषी विद्यापीठाला भेट

 उसानंतर आता मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन शेतीसाठी सुद्धा AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव च्या उपळा गावात हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यासाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला असून राहुरी कृषी विद्यापीठाची पाहणी दौरा देखील केलाय. उपळा गावातील वेगवेगळ्या उत्पादन गटातील शेतकऱ्यांना घेऊन हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे . याबाबत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola